वाळूतस्करांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांना बडतर्फीची नोटीस

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : वाळूतस्करांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी अंकुश दहिफळे व कल्याण गाडे यांच्यावर दि.५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी सुरू होती. दोघांना जामीन मंजूर झाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यावर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील केले आहे. मात्र, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दहिफळे व गाडे या दोघांना खात्यातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खात्याची प्रतिमा मलिन केल्यामुळे व नियमबाह्य वर्तन केल्यामुळे तुम्हाला बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.