साईचरणी तीन दिवसांत ४ कोटी ३३ लाख रुपयांचे दान

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने २४ ते २६ मार्च २०१८ या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये सुमारे तीन लाख भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तीन दिवसांत ४ कोटी ३३ लाख रुपयांचे भरभरुन दान दिले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या दानात ८८ लाख ७२ हजार रुपयांच्या सोने-चांदीचा समावेश आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, साईबाबा संस्थानच्या वतीने २४ ते २६ मार्च दरम्यान श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
उत्सवादरम्यान सुमारे तीन लाख भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सवामध्‍ये रोख स्‍वरुपात एकूण रुपये ३ कोटी ३९ लाख, सोने-चांदी एकूण ८८ लाख ७२ हजार व परकीय चलन ६ लाख ३० हजार रूपये असे एकूण ४ कोटी ३३ लाख रुपये वस्‍तू, रोख, डेबीट-क्रेडीट, ऑनलाईन, चेक-डी.डी., मनिऑर्डर व परकीय चलन स्‍वरुपात देणगीद्वारे प्राप्‍त झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.