महसुल विभागाच्‍या सक्‍तीच्‍या पठाणी वसुलीस तातडीने स्‍थगित द्या.- ना.विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महसुल विभागाने सुरु केलेल्‍या सक्‍तीच्‍या पठाणी वसुलीला तातडीने स्‍थगिती द्यावी. अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांनी महसुल विभागाकडून राज्‍यात सर्वत्र सुरु असलेल्‍या सक्‍तीच्‍या पठाणी वसुलीबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या दरम्‍यान त्‍यांनी महसुल विभागाच्‍या त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर जोरदार टीका केली. याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील म्‍हणाले की, १ जानेवारी २०१६ पासुन अमलात आलेल्‍या कायद्यातील सुधारणांनुसार अकृषक कारणांसाठी तुकडेबंदीस असलेली मनाई शिथील करण्‍यात आली होती. 

अंतिम प्रादेशिक योजनेत अकृषक वापरासाठी राखीव असलेल्‍या झोनसाठी तुकडेबंदीचे कलम ७,८ व ८ अ लागु होणार नसल्‍याचे महसुल विभागाने घोषित केले होते. याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेते म्‍हणाले की, या नियमांच्‍या बदलानुसारच २० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचे किंवा तुकड्याचे झालेले व्‍यवहार नियमानुसार करण्‍यासाठीची प्रक्रीया सुरु करण्‍यात आली होती याकडे त्‍यांनी सरकारचे लक्ष वेधले.

विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील पुढे म्‍हणाले की, १५ एप्रील २०१७ पासुन अमलात आलेल्‍या कायद्यातील सुधारणांनुसार महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियमात कलम ४२ब व ४२क नव्‍याने दाखल करुन,नागरीक क्षेत्राच्‍या विकास आराखड्यात व जिल्‍ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रादेशिक योजनेत अकृषक वापरासाठी राखीव असलेल्‍या झोनसाठी कोणत्‍याही प्रकारे बिनशेतीची आवश्‍यकता नसल्‍याच्‍या उद्देशाने सुधारणा करण्‍यात आल्‍या होत्‍या. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आणि त्‍यानंतर १७ सप्‍टेंबर २०१७ रोजी पुन्‍हा शासनाने तुकडाबंदी कायद्यात सुधारणी केली. यामध्‍ये अकृषक वापरासाठी राखीव असलेल्‍या झोनसाठी प्रमाणभूत क्षेत्राची अट शिथील करण्‍यात आली व बाजार भावाच्‍या २५ टक्‍के दंड आकारुन यापुर्वी तुकडेबंदी कायद्याविरुध्‍द झालेले व्‍यवहार नियमीत करणे शक्‍य झाले होते.

यामध्‍ये राज्‍य सरकारने पुन्‍हा १७ जानेवारी २०१८ रोजी महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियमात सुधारणा करुन, गावठान हद्दीपासुन २०० मिटर परिघातील जमीनी या मानीव बिनशेतीस पात्र ठरविल्‍या. यासर्व बदलांची राज्‍य शासनाने मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करुन,या योजना सर्वसामान्‍यांच्‍या हिताच्‍या असल्‍याचे सांगितले होते.

ही सर्व वस्‍तुस्थिती असतानासुध्‍दा सध्‍या मात्र सामान्‍य माणसांना कायद्याचा धाक दाखवून सक्‍तीने वसुली केली जात आहे. असे सांगतानाच ना.विखे पाटील म्‍हणाले की, तुकडेबंदीबाबत २०१६ मध्‍येच अधिनियम क्रमांक २ नूसार तुकड्यांवरील निर्बंध शिथील करण्‍यात आले असल्‍याचे भासवून तलाठी व तहसिलदार यांनी अकृषक चारा व रुपातंरण कर या नावाखाली लोकांकडुन पैसे वसुल केले आहेत. तरीही आता जमिन मालकांना चालु बाजार भावाच्‍या २५ टक्‍के दंड भरण्‍याच्‍या नोटीसा महसुल विभाग देतच कसे असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

महसुल विभागाच्‍या परस्‍पर विरोधी धोरणांमुळे आपले क्षेत्र बिनशेती झाले की नाही अशा संभ्रमात नागरीक पडले आहेत असेही विरोधी पक्षनेते म्‍हणाले. पहिल्‍या सुधारणेनुसार बिनशेती झालेल्‍या क्षेत्रांबाबत पुन्‍हा बाजार भावाच्‍या २५ टक्‍के रक्‍कम भरण्‍याच्‍या दिलेल्‍या नोटीसा या अनाकलनिय असल्‍याने या सक्‍तीच्‍या व पठाणी वसुलीला सरकारने तातडीने स्‍थगिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.