श्रीगोंदा -चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेला सळईचे चटके

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेला लोखंडी सळईने चटके देऊन जखमी करण्याचा प्रकार तालुक्यातील बाबुर्डी येथे घडला. याप्रकरणी पीडितेचा पती कांतिलाल रामचंद्र पोटे व सासू कमल रामचंद्र पोटे यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दि. २६ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि. २० मार्च रोजी सायंकाळी मी घराच्या बाजूला असणाऱ्या चारीवर धुणे धुण्यासाठी गेली असता, मुलासोबत का बोलली, असे म्हणत पती कांतिलाल व सासू कमल यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

त्याचवेळी पती कांतिलाल यांनी लोखंडी सळई गॅसवर गरम करून माझ्या पायावर व मांडीवर चटके दिले. यामुळे माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मला घरात कोंडून दरवाजा बाहेरून लावून घेतला.तब्बल दोन तासांनी दरवाजा उघडल्यानंतर मी तेथून पळून गेले व बाजूलाच असणाऱ्या रेल्वे गोडाूनमध्ये एक रात्र व एक दिवस थांबून मी माहेरी बेलवंडी कोठार येथे आई- वडिलांकडे गेले व आई-वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला.  
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दरम्यान, विवाहितेच्या फिर्यादीवरून पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.