राजकारण - सोयऱ्या धायऱ्यांच्या पक्षात घराणेशाहीसोबतच हूकूमशाही

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी आतापर्यंत काय प्रताप केले, हे जनता विसरलेली नाही. त्यांच्या प्रतापामुळेच शहर बदनाम झाले आहे. सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल करणारे आघाडीचे नेते उजळ माथ्याने फिरत आहेत. एसी लावून चारचाकी वाहनात बसून राजकारण करणाऱ्यांचा शहर व मनपा सत्ताधाऱ्यांचा कितपत अभ्यास आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रदेश पातळीवर वाऱ्या करून पदे पदरी पाडून ते उपभोगून बदनाम असणाऱ्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. आपल्या पदाचा जनतेसाठी नाही, तर स्वहितासाठी वापर करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता पळता भुई करणार आहे. कोतकर पिता-पुत्रांच्या प्रतापामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे. सोयऱ्याधायऱ्याच्या पक्षात घराणेशाही तर आहेच, याशिवाय दडपशाही व हूकूमशाही देखील आहे, अशी टीका शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केली.

केडगाव येथील प्रभाग ३२ ब च्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार विजय पटारे यांच्या प्रचाराचा शिवाजीनगर येथे शुभारंभ करताना राठोड बोलत होते. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, सभागृहनेते गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक विक्रम राठोड, संदेश कार्ले, हर्षवर्धन कोतकर, संभाजी कदम, शरद झोडगे, आशा निंबाळकर, रियाज सय्यद, सुरेश तिवारी, संजय शेंडगे, योगीराज गाडे, भगवान फुलसौंदर, दीपक खैरे, राजेंद्र पठारे, संतोष गेनाप्पा, रमेश परतानी, वसंत शिंदे आदी उपस्थित होते. 

राठोड म्हणाले, प्रभाग ३२ ब चे विरोधी उमेदवार मतदारांना भावनिक भुरळ घालू पाहत आहेत. मतदारांना भुलवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या या भुलभैलय्याला मतदारांनी बळी पडू नये. ही निवडणूकच मुळात कोणामुळे लादली गेली, हे मतदार जाणतो.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, शिवसेनेची मनपात संपूर्ण सत्ता आल्यापासून विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र सगळीकडे दिसते आहे. पोटनिवडणुकीत आघाडीला आपल्या उमेदवाराचा पराभव दिसू लागला आहे. दिलीप सातपुते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने शहराला बदनाम केले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी त्यामध्ये सातत्य कायम ठेवले आहे. 

दुसऱ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारेच बदनाम आहेत. शिवसेनेची मनपात सत्ता आल्याने शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. ही गती विघ्नसंतोषी लोकांना नकोशी वाटत असल्याने ते आरोप करत आहेत. कामे कमी व गवगवाच जास्त ही परिस्थिती बदलायला हवी, असे सातपुते यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.