नेवासे - जप्त केलेले वाळूचे टेम्पो तहसीलच्या आवारातून पळवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केलेले वाळूचे दोन टेम्पो (किंमत ७ लाख) तहसीलच्या आवारातून पळवण्यात आले. याबाबतची फिर्याद कामगार तलाठी गोरक्षनाथ भालेराव यांनी पोलिसांकडे दिली आहे. मंडलाधिकारी डी. पी. साळवे, भेंड्याचे तलाठी व्ही. के. जाधव यांनी २३ मार्चला सकाळी एमएच ४ बीजे १२९८ या क्रमांकाचा ७०९ टेम्पो २ ब्रास वाळूसह पकडला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
२६ मार्चला कामगार तलाठी भालेराव आणि बालाजी मलदोडे यांनी ज्ञानोदय हायस्कूलजवळ २ ब्रास वाळूसह एमएच ११ टी १५३३ नंबरचा ४०७ टेम्पो पकडला. टेम्पो तहसील आवारात आणून उभे केले. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची होती. कार्यालयास दोन दिवस सुटी होती. या काळात या दोन्हीही टेम्पो व त्यातील १ लाखाची ४ ब्रास वाळू लांबवण्यात आली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
टेम्पोचालक नीलेश पिटेकर व सागर लष्करे यांनी कारवाई टाळण्यासाठी टेम्पो चोरल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, महसूल खात्याला न जुमानता जिल्ह्यात सर्वत्र सध्या वाळूचोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता तर जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात पळवून नेण्याची हिंमत वाळूचोर दाखवू लागल्याने चिंता वाढली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.