शिर्डी - बसस्थानकावर बेवारस बॅगमुळे घबराट

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी बसस्थानकावर बेवारस बॅग आढळल्याने घबराट पसरली होती. अवघ्या पाचच मिनिटात श्वान 'वर्धन' व पथकाने भेट देऊन तेथे पाहणी केली. तपासणी केल्यावर बॅग लखनऊ येथील साईभक्ताची असल्याचे समजले. चौकशी केल्यानंतर संबंधिताच्या शिर्डी येथील नातेवाइकांच्या ताब्यात ती बॅग देण्यात आली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की,नगर येथील कुरिअर स्फोटानंतर शिर्डी शहरातही बॉम्ब शोधक पथक दक्ष असून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. २४ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान शिर्डी बसस्थानकावर बेवारस बॅग असल्याची माहिती स्थानक प्रमुख ठकाजी जगताप यांनी पथकाला दिली. 

या बेवारस बॅगमुळे काही काळ बसस्थानक परिसरात घबराट पसरली होती. अवघ्या पाचच मिनिटात श्वान 'वर्धन' व पथकाने बसस्थानकावर भेट देऊन पाहणी केली. बॅगची तपासणी केली त्यात स्त्री व पुरुष यांचे कपडे व महिलेचे छोटे पाकीट मिळून आले. त्यात ३ हजार रु. रोख रक्कम मिळून आली. तपासणी केल्यावर बॅग लखनऊ येथील साईभक्ताची असल्याचे समजले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
चौकशी केल्यानंतर संबंधिताच्या शिर्डी येथील नातेवाइकांच्या ताब्यात ही बॅग देण्यात आल्याचे सांगितले. या कारवाईत बॉम्ब शोधक पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास घनवट, महमद शेख, संदीप पाठक, शाम गुजर, सतीश कुटे यांनी भाग घेतला. 

जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील साईमंदिर, रेल्वेस्थानक, विमानतळ व सर्व परिसरावर श्वान 'जम्बो' आणि 'वर्धन' यांच्या सहाय्याने काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. विविध ठिकाणी पथकाने सुरक्षेबाबत फलक व फोन नंबर उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.