जामखेड - शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील अशोक रामदास जाधव या शिक्षकाने आपल्या रहात्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. एक वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत समजलेली माहिती अशी, की मयत शिक्षक अशोक रामदास जाधव, (वय ३७) हे तालुक्यातील पाडळी या ठिकाणी जिल्हा परिषद प्रथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली असून या चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये, असे लिहले आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
एक वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेंव्हापासून ते मानसिक तणावात असत. त्यांना सात वर्षाचा मुलगा असुन आईनंतर वडीलांचे छत्र हरवल्याने मुलावर पोरके होण्याची वेळ आली आहे. जाधव शिक्षक हे मुळचे नायगाव येथील असुन गेल्या अनेक वर्षांपासून ते जामखेड येथेच रहात होते. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.