राहाता - अखेर त्या' चार अल्पवयीन मुली सापडल्या नातेवाइकांकडे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील राजुरी येथील एका विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेल्या चार अल्पवयीन मुली शुक्रवारी (२३ मार्च) सकाळी ११ वाजता बेपत्ता झाल्या होत्या. या मुली पुण्यातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप सापडल्याने त्यांचे पालक व पोलिसांनी रविवारी सुटकेचा नि:श्वास सोडला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
चार अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. लोणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यादृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. १४ वर्षांच्या या मुली शाळेत जातो, असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर त्या घरी न आल्याने पालकांनी एकमेकांच्या घरी चौकशी करुन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर मेहेरदीप सुधाकर आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. हे वृत्त समजताच गावात खळबळ उडाली. पोलिसांनी या मुलींच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. पुण्यातील नातेवाईकांच्या घरी या मुली असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ पुण्याला जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या मुली सुखरूप आहेत.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या चारही मुली शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शाळेतून निघाल्या होत्या. तेथून रिक्षाने त्या शिर्डीला गेल्या. तेथे खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर त्या एसटी बसने अहमदनगर येथे गेल्या. या मुलींमधील एकीने पुण्यातील मावसभावास फोन करून त्याला नगर येथे बोलावून घेतले.

त्याच्यासमवेत त्या पुण्याला गेल्या. शनिवारी रात्री लोणी पोलिसांच्या पथकाने या मुलींना ताब्यात घेतले. रविवारी लोणी पोलिस ठाण्यात आणून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या मुली सुखरूप मिळाल्याने पालक व पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.