अहमदनगर - मायलेकींना जिवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तुझ्या लग्नात खूप पैसे खर्च केले, असे म्हणत मायलेकींना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी प्रियंका सूर्यकांत तिवारी (२२, मिलिंद कॉलनी, आलमगीर) यांच्या फिर्यादीवरून अजय ऊर्फ निखिल लक्ष्मण शिंदे (२३, बुरूडगाव रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपीने घरात घुसून शिवीगाळ करत तुझ्या लग्नाला खूप खर्च केला, तुम्हाला जीवे मारून टाकेन, असे म्हणाला. त्यानंतर सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास आरोपी परत आला. त्याने फिर्यादी प्रियंका व तिची बहीण निधीवर कोयत्याने वार केला. प्रियंकाची आई सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करेवाड करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.