अहमदनगर - शहरात 7 कि.मी.लांबीचा उड्डाणपूल लवकरच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा डीपीआर पुर्ण झाला असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याची  माहिती खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.खा. गांधी म्हणाले की, उड्डाणपुलाचा रस्ता पूर्वी राज्य महामार्ग होता, आता तो राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
 पूर्वीपेक्षा दुप्पट लांबीचा उड्डाणपुल करण्यात येणार असून सात किमी लांबीचा उड्डाणपुल करण्याचा आपला प्रयत्न आहे.त्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले की,नगर जिल्ह्याचा केंद्राच्या भारतमाला योजनेत समावेश झाला आहे. जिल्ह्यातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात येत आहेत. या सर्व रस्त्यांचे क्रॉंक्रीटीकरणाचे काम होणार आहे.

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
रस्त्यांची कामे झाल्याने नगरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा विभाजन होणार असल्याचे सांगून खा. गांधी म्हणाले की, कामकाजात सूसुत्रता येण्यासाठी आपण वर्षभरापुर्वी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून लोकसभा मतदारसंघाचा जिल्हा करावा, अशी मागणी केलेली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.