कोपरगाव - विविहितेस जिवे मारण्याची धमकी देत अत्‍याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील एका २६ वर्षांच्‍या विविहितेच्‍या भोळसटपणाचा फायदा घेत तीस जिवे मारण्याची धमकी देऊन कोळपेवाडी येथील चारजणांनी गेल्‍या चार ते पाच वर्षांपासून सातत्‍याने विनयभंग व अत्‍याचार केल्‍याची फिर्याद पीडित महिलेने कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी चारजणांविरूद्ध गुन्‍हा नोंदविण्यात आला असून पैकी तीन आरोपींना पोलिसांनी तातडीने जेरबंद केले आहे. एका पसार आरोपीच्‍या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २६ वर्षांच्‍या विवाहितेच्‍या भोळसरपणाचा फायदा घेऊन व जीवे मारण्याची धमकी देऊन कोळपेवाडी येथील शहानुर पठाण, कैलास कोळपे, भाऊसाहेब गाडेकर व शिवाजी कोळपे या चारजणांनी गेल्‍या चार ते पाच वर्षांपासून पिीडतेच्‍या घरी, शिर्डी व येवला येथील लॉजवर घेऊन जाऊन जबरदस्‍तीने वेळोवेळी अत्‍याचार केला असल्‍याचे विवाहित महिलेने म्हटले आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या फिर्यादीवरून वरील चार आरोपींविरोधात कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा रजि. नं. ३४/२०१८, भादंवि कलम ३७६ड, ३६३, ४५२, ३५४, ३४ प्रमाणे गुन्‍हा दाखल केला आहे.या गुन्‍ह्यातील शहानुर पठाण, कैलास कोळपे, भाऊसाहेब गाडेकर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाजी कोळपे हा पसार झाला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.