मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यामागे खासदार गांधी समर्थक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा दौरा काही दिवसांपूर्वी अचानक रद्द झाला होता. रविवारीही त्यांनी पाथर्डीचा दौरा एेनवेळी रद्द केला. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा दौरा रद्द करण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवन गौरव समारंभाच्या कार्यक्रमपत्रिकेत खासदार दिलीप गांधी यांचे नाव टाळून मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा जाहीर झाल्याने गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांवर दौरा रद्द करण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे त्यांचे समर्थक सध्या राज्य सरकारवर नाराज आहेत. हजारे यांचे समर्थकही निदर्शने करण्याची शक्यता लक्षात घेऊनही मुख्यमंत्री फडणवीस यांंनी पाथर्डी येथे ज्येष्ठ नेते ढाकणे यांच्या गौरव समारंभास येण्याचे टाळले असावे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यातच येळीचे सरपंच संजय बडे, 'आप'चे किसन आव्हाड, शेतकरी विद्यार्थी संघटना आदींनी आत्मदहन व आंदोलनाचे इशारे दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी येणे टाळल्याची चर्चा आहे. मेस्मा कायदा मागे घेतल्याने फडणवीस व मंत्री मुंडे यांच्यातील तणाव गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियात गाजत आहे. 

पाथर्डी तालुका पंकजा मुंडे यांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचे समर्थक आक्रमक होऊन जाब विचारणार आहेत. प्रसंगी वेगळा मार्ग हाताळू शकतात, अशी गुप्तवार्ता मिळाल्याने मुख्यमंत्री सावध झाले. मंत्री मुंडे कार्यक्रमाला येणार नव्हत्याच. त्या नसतील, तर पाथर्डीला जाण्याची रिस्क नको, ही खबरदारी घेत मुख्यमंत्री नागपूरला रामचरणी धावले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.