श्रीगोंदा शहरात युवकाचा मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा येथील सिद्धेश्‍वर मंदिरा जवळील काशीकुंडालगत तीस वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळला.नारायण रामचंद्र हरिहर असे युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास काशीकुंडाजवळ एक मृतदेह आढळून आल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यानंतर घटनास्थळी शहरवासियांनी एकच गर्दी केली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृतदेह श्रीगोंदा शहरातील नारायण हरिहर यांचा असल्याचेस्पष्ट झाले. या प्रकरणी हरिहर याचे नातेवाईक गणेश अविनाश चव्हाण याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती दिली. नारायणाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे सांगण्यात येते. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. नारायण हरिहर यांच्या मृत्यू मागील नेमके कारण समजू शकले नाही.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.