…तर भाजप कार्यालयांना टाळे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भीमा-कोरेगावच्या घटनेतील आरोपी मनोहर भिडे गुरुजींसह इतरांना अटक करण्याची मागणी नेवासा तालुक्‍यातील बहुजन, दलित समाजातील कार्यकर्ते, नेत्यांनी केली आहे. त्यांना अटक न झाल्यास भाजपच्या कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा नेवासा तालुका लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संजय सुखधान यांनी म्हटले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमून काही आरोपींची नावे घेतली; त्यात मनोहर भिडे गुरुजींचे नाव निष्पन्न झाले असून, तीन महिने उलटले तरी त्यांना अद्यापही अटक झालेली नाही.

भाजप सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. जर घटनेत संबंध नसेल तर स्वत: भिडे यांनी चौकशीला सामोरे जाणे गरजेचे होते. परंतु, केवळ जातीय तेढ व देशामध्ये दंगली घडविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. भिडे गुरुजींना अटक न झाल्यास बहुजन नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेसाठी मुंबईला मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------

त्यांच्या या आंदोलनाला आम्हीही पाठिंबा देत असून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारला जाग येण्यासाठी व भिडे गुरुजींना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही 24 मार्च रोजी नेवासा तालुक्‍यातील भाजपचे कार्यालय बंद करू व टाळे ठोकू, असा इशारा सुखधान यांनी दिला.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.