डाळींब बागांना आग लागून सातशे झाडे जळाली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक शिवारात शेतातून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीच्या खांबांवरील विज तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागून दोन डाळींब बागा जळाल्या. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लागलेल्या आगीत सुमारे सातशे डाळींब झाडे जळाली असून सुमारे चार ते पाच लाख रुपयांची हानी झाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक शिवारात शनिवारी दुपारी वीज खांबावरील तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने अण्णासाहेब विश्वनाथ गडाख यांच्या मालकीच्या शेतातील डाळींब बागेस आग आली. आगीत सुमारे पाचशे झाडे जळाली.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------

बाबाजी बाळापाटील गडाख यांच्या शेतातील डाळींब बागेस आग लागून दोनशे झाडे जळाली. बागेतील ड्रीप सिस्टीमही जळून गेली. अचानक लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न असफल झाले. डाळींब बागा जळाल्याने सदर शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन उन्हाळ्यात आग लागून डाळींब बागा जळाल्याने सदर शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.