पाच लाखांसाठी नवविवाहितेचा विष पाजून खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून नवविवाहितेला विष पाजून खून करण्याचा प्रकार मांदळी (ता. कर्जत) येथे झाला. तशी फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी कर्जत पोलिसांत दिली आहे. आरोपींच्या अटकेसाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास संतप्त नातेवाईकांनी नवविवाहितेचा शवविच्छेदनानंतरचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर रुग्णवाहिकेत ठेऊन रास्तारोको केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपी पतीच्या अटकेनंतर आंदोलन थांबवत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तिच्या सासरी (मांदळी) नेण्यात आला.
मृत विवाहितेचे वडील हरिदास जाधव (रा. पाटेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत हकीकत अशी, मांदळी (ता.कर्जत) येथील नवविवाहिता पल्लवी अक्षय गांगर्डे हिला शुक्रवारी (दि. 23) विषारी द्रव पाजण्यात आला. (दि. 24) तिचे निधन झाले. यातील आरोपी पती अक्षय बापू गांगर्डेने तिला विष पाजल्याचा आरोप आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------

आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोरील रस्ता अडवून संतप्त नातेवाईकांनी आंदोलन सुरू केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. अडीच तासांच्या आंदोलनानंतर आरोपीच्या अटकेची खात्री झाल्यावरच आंदोलन बंद केले गेले.
------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.