महापालिकेतील युतीच्या कारभाराने नगर शहराची प्रतिष्ठा धुळीला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिकेतील सेना-भाजपा कारभाराने शहराची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. " असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख यांनी केले. अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग  क्र.32 मधील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. विशाल कोतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अध्यक्षस्थानी शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप हे होते. यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले," आ.जगताप व संदीप कोतकर यांनी महापौर पद भुषविले होते. त्यांच्या काळात केडगाव मध्ये मोठी विकासकामे झाली. सध्याचे सत्ताधारी मात्र केडगाव कडे दुर्लक्ष करीत आहेत.

संघटनेच्या कामासाठी मी राज्यभर फिरतो. आतापर्यंत अहमदनगरची वेगळी ओळख होती. नगरचा किल्ला, आनंदरूषीजींची समाधी, साईबाबा, अवतार मेहेरबाबा, अण्णा हजारे यांच्या नावाने नगर ओळखले जात असे. मागील काही दिवसात मात्र " छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल अश्लाघ्य बोलणारया भाजपा पुढारयाचे नगर" अशी कुकिर्ती नगर शहराची झाली आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------

या निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रवुत्तीला धडा शिकवावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. यावेळी आ.संग्राम जगताप, माजी उपमहापौर सौ.सुवर्णा कोतकर, प्रा.माणिक विधाते, सुनील कोतकर, निखील वारे,बाळासाहेब पवार, बाळासाहेब भंडारी, यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.