नगर शहरातील कचरा डेपो हटवण्याचा प्रश्न चिघळणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी येथील कचरा डेपो हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गाड्या अडवून आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कचरा डेपोत टाकण्यात आला. पण डेपो हटवण्याची मागणी अजूनही हवेत विरलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात मनपा अपयशी ठरत आहे, हे वास्तव उघड आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, महापालिका संपूर्ण कचरा उचलण्यात अपयशी झाली आहे. कचरा कुंड्यातच साचून राहिल्याने बेशिस्त नागरिक कुंडीबाहेर कचरा फेकतात. कचरा उचलण्यासाठी आलेली वाहने केवळ कुंड्यातील कचराच संकलीत करता येतो. परंतु, कुंडीबाहेरचा कचरा उचलणे शक्य होत नाही. तसेच जेथे कुंड्या नाहीत, त्याठिकाणी रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ येथील नागरिकांवर येते.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सावेडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी सुटली असून त्याचा त्रास होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. याप्रकरणी कचरा वाहतूक करणारी वाहने कचऱ्यासह अडवण्यात आली होती. दोन दिवस कचरा वाहनातच राहिल्याने संपूर्ण कचरा संकलन यंत्रणाच कोलमडली होती. 

त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन रात्रीपासून कचरा डेपोत टाकण्यात आला. सध्या बुरुडगाव येथील खतप्रकल्प बंद असून शहरातील कचऱ्याचा बोजा सावेडी येथील डेपोवर पडला आहे. सावेडी कचराडेपोसाठी ज्यांनी ठराव केला होता, त्यांनाच आता कचऱ्याचा त्रास होत अाहे, असेही आरोप करण्यात येत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.