नगर- पुणे रस्त्यावरील वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा,चार जणांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर- पुणे रस्त्यावरील चास शिवारात वेश्या व्यवसाय चावलवणाऱ्या हॉटेल माथेरानवर पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकला. हॉटेल माथेरानच्या आवारात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करून पिडित महिलांची या वेश्या व्यवसायातून सुटका करत चार आरोपींना ताब्यात घेतले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संतोष दत्तात्रय कोतकर (३५ , रा. अंबिका हॉटेलजवळ, केडगाव), भरत शंकर लांडगे (५३ , चास, नगर), प्रशांत रमेश पंडित (२३ , स्टेशन रोड, मल्हार चौक) व बाळकृष्ण साहेबराव चव्हाण (३३ , रा. घाटदेऊळगाव, चव्हाणवाडी, ता. आष्टी, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यात आरोपी संतोष व प्रशांत हे पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.