सेनेच्या कळपात गेलेला वाघ तडीपार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेला राजू उर्फ राजूमामा जाधव (जंगुभाई तालिम, तोफखाना) याला मटकाप्रकरणी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईत जाधव याच्यासह आणखी तिघांचा समावेश आहे. तोफखाना परिसरातील नगरसेवकपदाचा शिवसेनेचा संभाव्य उमेदवार म्हणून जाधव याच्याकडे पाहिले जात होते. मात्र, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई केल्याने जाधव याच्यासह शहरातील मटकाबुकींचे धाबे दणाणले आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहर व उपनगरांमध्ये मटका व जुगार अड्यांचे पेव फुटले आहे. भिंगार, नागापूर- बोल्हेगावसह मध्यवर्ती शहरात राजरोसपणे मटक्यांचे अड्डे सुरू आहेत. त्यात राजूमामा जाधव हे मटकाबुकी शहरात कुप्रसिध्द आहेत. त्यांच्यासह साथीदारांवर अनेकदा कारवाई होऊनही त्यांचा मटकाबुकीचा धंदा तेजीत होता.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मात्र, पोलिस अधीक्षक शर्मा यांनी जाधव यांच्यासह जगदीश वामन वाकोडे (सिव्हील हडको, नगर), संजय रामचंद्र पेठकर (सातपुते तालमीजवळ, तोफखाना) व विजय गंगाराम गवळी (निलक्रांती चौक) यांना तडीपार करण्यात आले आहे. चौघांवरही मुंबई जुगार कायदा, लॉटरी अधिनियम, तसेच भादंविनुसार गुन्हे दाखल होते. त्यानुसार त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. 

पोलिस अधीक्षक शर्मा व हद्दपार प्राधिकरण यांनी मटकाबुकींचा टोळीप्रमुख जाधव याच्यासह तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केल्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाधव याने सेनेत प्रवेश केला होता. जाधव याच्या शिवसेना प्रवेशाचे शहरभर फलक लावले होते. वाघ चालला वाघांच्या कळपात, असे फलक शहरभर झळकत होते. परंतु सेनेच्या कळपात गेलेल्या या वाघाला आता तडीपार करण्यात आल्याने मटकाबुकींचे धाबे दणाणले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.