बाजार समितीमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोकळ्या जागा विकण्याचा आणि काही जागांवर गाळे बांधून विकण्याचा सपाटा बाजार समिती सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. वाट्टेल तेथे गाळे बांधत ते विकून सत्ताधाऱ्यांनी १०० कोटी रुपये खिशात घातले. बाजार समितीमध्ये मात्र अत्यल्प रक्कम भरली. याविरोधात काँग्रेस-शिवसेना महाआघाडी पणन महासंघ, उपनिबंधक कार्यालय, मनपाकडे तक्रार करणार आहे. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही महाआघाडीने दिला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यासंदर्भात हॉटेल यश पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाआघाडीने हा इशारा दिला. यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, प्रा. शशिकांत गाडे, संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, प्रताप शेळके, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, संदीप गुंड, नगरसेवक योगिराज गाडे, जयंत वाघ आदी उपस्थित होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
महाआघाडीचे नेते म्हणाले, सध्याच्या भाजी मार्केट भागातील मुळ आराखड्यात मध्यभागी ओपन स्पेस आहे. तेथे शेतकऱ्यांच्या गाड्या लावण्यासाठी राखीव जागा आहे. आमच्या काळात त्यातील काही शिल्लक जागेवर केंद्र शासनाच्या निधीतून कांदा शेड उभारले होते. तेथे अनधिकृतपणे २८ पत्र्याचे गाळे उभारत प्रत्येकी ३५ लाखांना त्याची विक्री केली आणि बाजार समितीमध्ये पाच लाखांचीच करारावर नोंद आहे. 

याच मार्केटच्या मागच्या गेट जवळही अनधिकृत गाळे बांधून त्याची विक्री केली. इमारत बांधताना अगोदर संचालक बैठकीत मंजूरी, अभियंता प्लॅन, त्याला महानगर पालिका टाऊन प्लॅनिंगची मंजुरी, उपनिबंधक, पणन महासंघाची मंजुरी असा क्रम असतो. पण सत्ताधाऱ्यांनी सर्व अनधिकृतपणे केले आहे. या विरोधात आम्ही पणन महासंघ, जिल्हा उपनिबंधक, मनपा आयुक्त यांच्या कडे तक्रार करणार आहोत. १५ दिवसांत कारवाई करावी. संचालकांवर या भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करत न्यायालयात जाण्याचा इशाराही महाआघाडी नेत्यांनी दिला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.