गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चोऱ्या, रस्तालूट, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यातील आरोपी शारम उर्फ अक्षय छगन भोसले (रा.साईनाथनगर, नागफणी, ता.नेवासे) याला पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यामुळे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने आरोपी भोसले याला पकडले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्याने पढेगाव येथे बापूसाहेब घोडे यांच्या घरी तसेच चाळीसगाव, कोपरगाव या भागात केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली. भोसले याचा साथीदार जगदीश उर्फ कृतिक उपqलग चव्हाण (रा. अनकुटे, ता.येवले, जि. नाशिक) हा फरार आहे. भोसले याला पकडल्याने नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक दरोडे व घरफोड्यांचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.