राळेगणमध्ये मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सरकारचा जाहीर निषेध नोंदवला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मोदी सरकारकडून १३ रेल्वे व अनेक बस अडवण्यात आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून दाखवण्यात झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच लाभेष औटी, मा.सरपंच जयसिंग मापारी, रमेश औटी, सुभाष पठारे, अरुण भालेकर, कांतीलाल औटी, निवृत्ती मापारी, गणपत पठारे, बाळू मापारी, सुग्रीव आवारी, नाना लंके, त्रिंबक गाजरे, गणेश आवारी, रोहिदास पठारे आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
अण्णांच्या आंदोलनात सरकारकडून अडथळे आणले जात आहेत. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव व निवडणुका सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. आतापर्यंत अण्णांच्या आंदोलनात कधीही हिंसाचार झालेला नाही. सर्व आंदोलने ही अहिंसात्मक मार्गानेच झालेली आहेत. पण सरकारने आंदोलनाला जाणाऱ्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखल्यामुळे आज राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांकडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.