विभाजन झाल्यास श्रीरामपूरच मुख्यालयासाठी योग्य !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजन करण्यास सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे. मात्र, त्यापूर्वीच संगमनेरकरांनी जिल्ह्याची मागणी सुरू केली आहे. खरंतर नगर जिल्हा विभाजनानंतर श्रीरामपूर हाच जिल्हा होण्यासाठी सर्वस्वी पात्र असे ठिकाण असल्याने जिल्ह्याचा मान श्रीरामपूरलाच मिळायला हवा! याबद्दल कोणाचेच दुमत नक्कीच नाही.----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------


श्रीरामपूर हे नगर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते. प्रशस्त अशा सर्व सुविधांनीयुक्त प्रशासकीय इमारती, लांबपल्ल्याचा रेल्वेमार्ग व रेल्वेस्टेशन, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, कोल्हापूर, नागपूर यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडले जाणारे प्रशस्त रस्ते, सरकारी जागांची विपुल उपलब्धता, शाश्वत पाणी,

भौगोलिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत किफायतशीर, सहजसोपे दळणवळण, शहराची आखीव रेखीव नियोजनबद्धता, पुरातन परंपरा, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, सहकार, कृषी, साहित्यिक, समृद्ध बागायती जमिनी, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या पाऊलखुणा असलेले शहर म्हणून श्रीरामपूरकडे आदराने पाहिले जाते.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यातच राज्यातील अन्य मोठ्या शहरापेक्षाही मिळणारी आरोग्यसेवा, शिक्षण, व्यवसायपुरक बाजारपेठ, बँका, सोसायट्या आणि पतसंस्थांचे जाळे, विविध पक्षातील नेत्यांमधील सृजाण विचारधारा, चिंतनशील राजकारण, नगरपालिका आणि सक्षम ग्रामपंचायती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, प्रेक्षणीय स्थळे, व्यापार उदीम यासारख्या नवीन जिल्ह्यासाठी उपयुक्त असलेल्या बाबी श्रीरामपूरला अगोदरच उपलब्ध असल्याने जिल्ह्याचा मानकरी खरा श्रीरामपूरच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीरामपूर जिल्हा करून त्यात देवळाली प्रवरा शहराचा तालुका म्हणून समावेश करणे, म्हणजे नवीन जिल्ह्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.