सुजय विखे पाटलांकडून आता जामखेड 'टार्गेट'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनसेवा फौंडेशन आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील हळगांव येथे बुधवार दि.२८ मार्च २०१८ रोजी सर्वरोग‍ निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर दि.२८ मार्च २०१८ रोजी दुपारी ४ वा. जामखेड येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील समृध्‍दी कॉम्‍प्‍लेक्‍स येथे डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही संपन्‍न होणार आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हळगांव श्री.भैरवनाथ विद्यालयाच्‍या प्रागंणात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
जामखेड तालुक्‍यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्याच्या तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ञ डॉक्‍टरांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात डोळ्यांचे विकार, अस्‍तीरोग, स्‍त्रीरोग, ह्रदय विकार, बालकांच्‍या विविध आजारांबाबत तपासण्‍या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवा फाउंडेशन व डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्‍या वतीने करण्यात आले आहे..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.