नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे हे उपकार नसून लोकप्रतिनिधीचे कर्तव्य -उपमहापौर अनिल बोरुडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे हे उपकार नसून लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. उपमहापौर निवड झाल्यावर येथील नागरिकांनी सत्कार करुन, या रस्त्याच्या प्रश्‍नाची जाणीव करुन दिली होती. सभागृह नेते गणेश कवडे यांच्याशी चर्चा करुन मनपात पाठपुरावा करुन या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. गणेश कवडे सारखे नगरसेवक मिळाल्यानेच या प्रभागाचा कायापालट झाला असून, अनेक विकासकामे मार्गी लागल्याची भावना उपमहापौर अनिल बोरुडे यांनी व्यक्त केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रभाग क्र.22 नालेगाव येथील बोरुडे गल्ली, सातपुते तालिम परिसरात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ उप महापौर बोरुडे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभागृह नेते गणेश कवडे, नगरसेविका सुनीता मुदगल, सुरेश बोरुडे, गणेश शिंदे, प्रशांत काळे, योगेश सुडके, राजु वाळके, प्रल्हाद बोरडे, ओंकार शिंदे, शुभम सुडके, ऋषीकेश डागवाले, नितीन वराडे, तुषार सुडके, मयूर बोरुडे आदिंसह नागरिक उपस्थित होते.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
गणेश कवडे म्हणाले की, प्रभागात विकास काम करताना त्याच्या दर्जाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. नागरिकांनी देखील जागृक राहून ठेकेदारकडून उत्तम दर्जाचे काम करुन घ्यावे. दर्जेदार विकासात्मक कामे झाल्यास त्या नगरसेवकाचे नांव घेतले जातात. 

नाहितर नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागते. विकास व दर्जेदार काम केंद्रबिंदू मानून शहरात शिवसेनेच्या वतीने विकासात्मक कामे मार्गी लावली जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असून, त्यांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.