मिर्झा खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील हुसेननगर भागात साजिद मिर्झा याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणातील फरार आरोपी अब्दुल्ला अश्पाक शेख (वय ३०), वसीम महेमूद खान (वय ३३, दोघे रा. हुसेननगर, श्रीरामपूर) यांना येवला (जि. नाशिक) येथे शहर पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी : शेजारील जागा न विचारता खरेदी केली. याबदल्यात मागितलेली दहा लाख रुपयांची खंडणी न देता पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने दहा ते बारा जणांनी घरात घुसून तलवार, लाकडी दांडा, गज, चाकूने मारहाण करत धुडगुस घातला होता. यात साजिद याचा खून झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दोन आरोपी येवल्यात असल्याची पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जोेसेफ साळवे, सोमनाथ गाडेकर, करमल, किल्लेदार यांचे पथक येवल्याला पाठविले. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
या पथकाने अब्दुल्ला व वसीम यांना पाठलाग करून पकडले. यापूर्वी फिरोज गफ्फार खान, तनजील गफ्फर खान, मौलाना अहमद फारूक शेख व विशाल लावंडे अशा चौघांना अटक केली आहे. आणखी दोघांना अटक केल्याने अटक केलेल्या आरोपींची संख्या सहावर पोहाचली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी जुबेर अश्पाक शेख, आयाज अश्पाक शेख, मुजमल बागवान, फरजाना फारूक शेख, नीलेश शिंदे हे अद्याप पसार आहेत. यांचाही पोेलीस शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.