पैशांसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एकाचे अपहरण करून ५ तोळे सोने व ३० हजार रुपये वसूल केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ब्राम्हणी येथील आण्णासाहेब कारभारी शेळके (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की ते दि. १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास स्कुटीवरून ब्राम्हणी गावात जात असताना हायस्कूलसमोर पप्पू कल्हापुरे व त्याच्या दोन ते तीन साथीदारांनी राखाडी रंगाचे चारचाकी वाहन आडवे घालून जबरदस्तीने गाडीत बसविले व देसवंडी येथे नेले.

तेथे कल्हापुरेने तुझ्यामुळे माझे पैसे गेलेले असल्यामुळे माझ्या पैशांची व्यवस्था कर, असे सांगितले. पैसे नसल्याचे शेळके यांनी सांगितल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर शेळके यांनी मित्र सोन्या राजू वैरागर याला फोन करून घरून तीस हजार रुपये रोख व एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन हॉटेलवर ठेवण्यास सांगितले. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
त्यावर कल्हापुरेने मला आणखी पैसे पाहिजे असे सांगून मुलाला आमच्या ताब्यात दे व तु घरी जाऊन पैसे आण, असे सांगितले. यावर शेळके यांनी मुलाला बोलावून घेतले व घरी जाऊन चार तोळे वजनाचे दागिने कल्हापुरे याला दिले. यावरून पप्पू कल्हापुरे (रा. देसवंडी), सिद्धांत मनोज अंबिलवादे व बबन लक्ष्मण राऊत या तिघांविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.