नगरमध्ये पैशाच्या व्यवहारावरून तलवारीने मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील हातमपूरा चौक येथे शनिवारी (दि. १७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पैशाच्या व्यवहारावरून वाद होवून झालेल्या भांडणाचा मनात राग धरत पाच जणांनी एकास तलवार व गजाने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलमान आझाद पठाण (वय २७, रा. मुकुंदनगर) यांचे बेलदार गल्ली येथील शेख यांच्याशी आर्थिक व्यवहारावरून वाद झाले. त्या वादाचा राग मनात धरून तरबेज अन्नू शेख, शहाबाज मलांग शेख, शद्दाब मलांग शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी सलमान यास शिवीगाळ, दमदाटी करत तलवार व गजाने बेदम मारहाण करत जखमी केले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आझाद नजिर पठाण यांच्या फिर्यादीवरून आर्मॲक्टसह खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोसई नयन पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.