वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेल संघर्ष येथे दि. २१ मार्च रोजी दुपारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील उपनिरीक्षक शकील सय्यद, हवालदार बाळू साबदे, संजय कदम, पोलीस नाईक अश्विनी पवार यांच्या पथकाने कारवाई करून दोन तरुणी व दोन ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर-मनमाड राज्य मार्गावरील हॉटेल संघर्ष येथे अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबर वाकचौरे यांना मिळाली होती. यावरून पोलीसांनी हॉटेलवर धाड टाकली असता दोन परप्रांतीय तरुणी व नांदूर येथील संतोष एकनाथ पवार व आरडगाव येथील सचिन अशोक धसाळ या दोन ग्राहकांना ताब्यात घेतले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दोन जण पसार झाले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहेत. याठिकाणी मोटारसायकल व काही विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हॉटेलही सील करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.