शेवगाव शहरात व्हॉंट्सॲपवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन गटांत तणाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्हॉंट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे शेवगाव शहरात दोन गटांत तणाव निर्माण झाला. हा मजकूर टाकणारा अभिमन्यू ऊर्फ अभी कुसळकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मजकूर टाकल्यामुळे जमावाने अभी कुसळकर याला मारहाण केल्याने उपचारासाठी त्याला नगर येथे हलविण्यात आले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेमुळे शहरात आज दिवसभर तणावाचे वातावरण होते. याबाबत रिजवान छोटूभाई शेख रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि.२२ मार्च २०१८ रोजी अजिंक्य फ्रेंड सर्कल नावाच्या ग्रुपवर अभिमन्यू ऊर्फ अभी कुसळकर याने त्याच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिमन्यू कुसळकर याच्याविरुध्द भा.दं.वि.कलम २९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज गुरुवारी दुपारच्या वेळी अभिमन्यू कुसळकर हे आपल्या शेतात गेले असता, पैठण रस्त्यावरील हॉटेल साईपूजासमोर सुमारे तीस ते चाळीस जणांच्या जमावाने हा मजकूर टाकल्याच्या कारणावरून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याला टाके पडले असून, पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.