कोपरगाव नगरपरिषदेत राजकीय भूकंपाची शक्यता !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव नगरपरिषदेत राजकीय भूकंपाची शक्यता आहे. १३ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर आठ आठवड्यात निर्णय घेण्याची हमी राज्य शासनाने हायकोर्टात दिली. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरपरिषदेत एकूण २९ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यात काही नगरसेवक हे सभागृहात तंबाखू, गुटका खातात व भिंती रंगवतात. काही नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केली व त्यांच्या टेबलावर कचरा आणून टाकला.

काही नगरसेवकांनी सार्वजनिक वापरासाठीची विद्युत जोडणी वैयक्तिक फायद्यासाठी वापरली. काही नगरसेवकांच्या नातेवाईकांचे बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण असून त्यांच्याविरोधात कार्यवाही करण्यात आलेली नाही. अशा विविध कारणांमुळे या नगरसेवकांवर महाराष्ट्र नगरपरिषद व नगर पंचायत कायदा १९६५ चे कलम ४२, ४४, १६ अपात्रतेची कार्यवाही करण्याची विनंती अंतर्गत अपात्र ठरविण्याची तक्रार काळे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सदर तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय न घेतल्याने अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. नगरसेवक राजेंद्र झावरे, कृष्णा आवाड, सपना मोरे, उज्वला रणशूर, वैशाली आडाव, सिंधुताई सिंगाडे,नयनकुमार वाणी, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, सुनीता राकशे, अलकाताई लकारे, मायादेवी खरे, शमीमबी कुरेशी यांच्याविरोधात सदर तक्रार करण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने म्हणणे मांडले. 

न्या. संभाजीराव शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठासमोर राज्यशासनाने आठ आठवड्यात सदर तक्रारीवर निर्णय घेण्याची हमी दिली. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. सतीश तळेकर यांना अॅड. उमाकांत आवटे, अॅड. अजिंक्य काळे यांनी सहाय्य केले. शासनाच्यावतीने अॅड. सिद्धार्थ यावलकर, न. प. कोपरगावतर्फे अॅड. मिलींद बिडकर यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.