तलवारीने केक कापणे ही आपली संस्कृती नाही : सुजित झावरे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तलवारीने केक कापणे व मोठा खर्च करणे ही आपली संस्कृती नाही अशा प्रकारच्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आपण करणं हे मला योग्य वाटत नाही अनेक राजकीय लोक यांचे अनुकरण करतात ही खेदाची बाब अाहे, अशी खंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केली. आपला वाढदिवस साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता पोस्टर बॅनर व जाहिरातबाजी न करता साजरा करावा, असे झावरे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बोलताना झावरे म्हणाले, आपण पाश्चात्य संस्कृतीला प्रोत्साहन देणार नसून त्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करणार नाही. धार्मिक उत्सव जयंत्या वाढदिवस या चंगळवादावर तरुण आकर्षित होत आहे. हे करत असताना त्याचा मोठ्या प्रमाणात अतिरेक होत आहे. त्यातून तरुणवर्ग वामार्गाला लागत आहे. हे समाजासाठी घातक आहे. म्हणूनच मी माझ्यापासून सुरुवात करत आहे. दोन वर्षांपूर्वी माझा वाढदिवस मोठय़ा धुमधडाक्यात साजरा केला होता त्याचा फटका माझ्या कार्यकर्त्यांना बसला. तोच पैसा सामाजिक उपक्रमांना लावला, तर त्याचे पुण्य आपल्याला मिळेल असेही ते म्हणाले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्त गोशाळांना चारा वाटप विधवा महिलांना साड्या वाटप अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ कपडे वाटप मिठाई वाटप हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळवाटप अशा प्रकारे वाढदिवस करणे हा माझा हेतू सामाजिक आहे राजकीय नाही. ज्याच्या खिशात पैसा आहे तो चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करू शकतो परंतु ज्याच्याकडे पैसाच नाही, घरची परिस्थिती गरीब आहे, आई वडील मजुरी करतात त्यांचे काय. त्यांनी आपला वाढदिवस कसा साजरा करायचा असा सवाल झावरे यांनी उपस्थित केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.