सराईत गुन्हेगार पप्पू चेंडवालला अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्तालूट, जबरी चोरी, दरोडे, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पप्पू चेंडवाल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चेंडवाल हा पांढरीपूल परिसरात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यानुसार पवार यांच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. चेंडवाल याने नगरमधील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केले होते. चेंडवाल याच्या विरोधात एमआयडीसी, सोनई, राहुरी, तोफखाना पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही त्याने अनेक गुन्हे केलेले आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक पवार यांनी व्यक्त केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.