पारनेरमध्ये काॅपी करू न दिल्याने शिक्षिकांना शिवीगाळ,जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- परीक्षेदरम्यान काॅफीबहाद्दरांवर कारवाई केल्याने व काॅपी पुरवू न दिल्याचा राग मनात धरून दहावीचा पेपर सुरू होण्याअगोदर काॅपी पुरवणाऱ्या टोळक्याने शिक्षक व गाडीवर दगडफेक केली. शिक्षकांसह शिक्षिकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी घडला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी दहावीचा माहिती संप्रेशन तंत्रज्ञानचा (आयटीसी) पेपर होता. यावेळी सकाळी ११.३० वाजता या माध्यमिक शाळेतील शिक्षक सुनील कारभारी वाव्हळ (जाधवनगर, कल्याण रोड, नगर) यांच्या मालकीच्या गाडीच्या (एमएच- १६ आर २१९९) काचा टिल्या थोरात (पूर्ण नाव माहित नाही) याने फोडली.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
 यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला शिक्षिकेसमोर शिवीगाळ करून बाहेर या तुमच्याकडे पाहतो, असे म्हणूत शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिली. गाडीचे व शाळेच्या फर्निचरचे नुकसान केले. तर इतर पाच ते सहा जणांनी याच विद्यालयातील सेमिनार हाॅलच्या दरवाजाची तोडफोड केली. इमारतीच्या काचाही दगडाने फोडण्यात आल्या. याप्रकरणी केंद्रचालक श्रीधर बाबासाहेब झावरे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांत िदलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.