शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न,जवानाला ५ वर्षे सक्तमजुरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून एका सेवानिवृत्त जवानाला न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. संजय सिताराम काटे (४१, रा. वडाळी, काटे मळा, ता. श्रीगोंदे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी गुरूवारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले. ही घटना नोव्हेंबर २०१६ मध्ये श्रीगोंदे तालुक्यातील सुरोडी येथे घडली होती. भास्कर दादा कांडेकर (३०) हे सहकुटुंब शेतीव्यवसाय करत होते. कांडेकर यांच्या शेतीला लागूनच संजय काटे यांची शेती होती. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
काटे हा लष्करात नोकरीला होता. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी संजय काटे याने कांडेकर यांच्या शेतातील कांद्याच्या पिकातून जनावरे घेऊन जात होता. त्यामुळे कांडेकर यांच्या भावाने त्याला विचारणा केली. काटेने त्यांना शिवीगाळ दमदाटी व डोक्यात दगडाने मारले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी ८ साक्षीदार तपासण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.