श्रीगोंद्यात दोन लहान मुलींना विषारी औषध पाजून आईची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : दोन लहान मुलींना विषारी औषध पाजून आईने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पिसोरेखांड येथे गुरुवारी (दि.22) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. पिसोरेखांड येथील विवाहिता श्यामल गणेश यरकळ (वय-28) हिने आराध्या (वय-3 ) आणि एक नऊ महिन्याच्या मुलीस विषारी औषध पाजून स्वतः आत्महत्या केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आराध्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर नऊ महिन्याच्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.पिसोरेखांड येथे यरकळ कुटुंबीय वास्तव्यास आहे. श्यामल हिने सायंकाळच्या दरम्यान दोन्ही मुलींना घरात घेऊन विषारी औषध पाजले. यातील तीन वर्षीय आराध्याला जास्त प्रमाणात औषध पाजले गेल्याने ती जागीच गत प्राण झाली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नऊ महिन्याच्या लहान मुलीला ही विष पाजून स्वत औषध प्राशन करून आत्महत्या केली.दरम्यान, या विवाहितेने मुलींना औषध पाजून स्वतः का आत्महत्या केली, याबाबत कोणताही माहिती उपलब्ध झालेली नाही. कौटुंबीक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.