चारा घोटाळ्यात 36 कोटी 50 लाखाच्या रकमा गायब.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 ते 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यात 200 कोटीच्या पुढे चारा छावणी घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात बोगस पशुधन व कोट्यवधी रुपयांचा ताळमेळ नसणे, तसेच 36 कोटी 50 लाख रुपयांचा रकमा गायब असणे, असे अनेक भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करताना याबाबत आपण शासनाला वेळोवेळी कागदपत्रांचे पुरावे सादर करुनही या कागदपत्रांच्या आधारे चारा छावणी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आता चारा छावणी चालकांवर 188 कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ती वस्तुस्थितीला धरुन नाही. चारा छावण्यांवर नियंत्रण व कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी होते. तेही प्रथमत: दोषी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते काका पाटील बाजीराव गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गायके यांनी म्हटले अर्जात म्हटले आहे की, चारा छावणी 2012 ते 2014 मधील चारा छावण्यांवर 188 कलमानुसार होत असलेली कारवाई योग्य नसून, याबाबत चारा छावणी घोटाळ्याच्या तक्रारी आपण वेळोवेळी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे चारा छावणीचालक व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या आशयाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

गायके यांनी 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले पत्र जिल्हा प्रशासनास सुपूर्द केले आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, गृहविभागाचे प्रधान सचिव, पशुसंवर्धनमंत्री आणि विभागीय आयुक्‍तांना पाठविल्याचे पत्रात नमूद केले आहे. तत्कालीन काळात पशुधनाची दाखविलेली संख्या बोगस असून याबाबत लोकशाही दिनात अर्ज करुनही तक्रारीची दखल घेतली नसल्याचे गायके यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.