प्रताप ढाकणे यांचे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे सक्रिय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनपाठोपाठ आता अॅड. प्रताप ढाकणे यांचे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे यांनीही शेतकरी फाउंडेशनची स्थापना केली. विखे यांच्याप्रमाणेच बिगर राजकीय उपक्रमांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी राज्यभर या माध्यमातून चळवळ राबवण्याचा निर्णय ऋषिकेश यांनी घेतला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ऋषिकेश यांनी वाढदिवसाचे कोणतेही सोपस्कार न करता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडे दिला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित चौनापुरे, पप्पू शिरसाट, सोमनाथ टेके, देवा पवार, सुमित फिरोदिया, रवी जाधव, अमोल गर्जे, सुनील बेळगे, भय्या थोरात, शुभम पंडित, नीलेश क्षीरसागर, सुरज आव्हाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ढाकणे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची करणे व त्यामागील परिस्थितीचा आपण अभ्यास केला आहे. ३२ वर्षांपूर्वी राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतर परिस्थितीत बदल होण्याऐवजी अधिक बिकट होत चालली आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेवर सहकार्य व जगण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये जगवण्याचे काम आपण विविध सहकाऱ्यांच्या माध्यमातून करू. पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती, पीक पद्धती, बाजारपेठेचा अभ्यास, जलसंधारण, लोकसहभाग आदी माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, आदर्श विवाह पद्धत अशा पातळ्यांवरसुद्धा काम केले जाईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्यभर या फाउंडेशनच्या शाखा सुरु झाल्यानंतर पुढील वर्षांपासून पूर्ण क्षमतेने काम सुरु होईल. तालुक्यातील हजारो भूमिपुत्र राज्यभर विविध भागात स्थायिक झाले आहेत. त्या सर्वांशी संपर्क साधून या चळवळीसाठी योगदान घेतले जाईल. सेवाभावी व स्वयंसेवी संघटनांच्या सहभागातून असे कार्य अधिक व्यापक करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. बिगर राजकीय सशक्त संघटन म्हणून शेतकरी फाउंडेशन कार्यरत राहणार आहे, असे सांगण्यात आले. दीपक बडे यांनी आभार मानले.

फाउंडेशनमार्फत की पक्षामार्फत निवडणूक? 
अॅड. प्रताप ढाकणे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा डॉ. सुजय विखे यांच्या घोषणेनंतर केली. विखे यांचे वडील काँग्रेसमध्ये, तर ऋषिकेश यांचे वडील अॅड. प्रताप ढाकणे हो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. डॉ. सुजय व ऋषिकेश दोघेही म्हणतात, राजकीय पक्षांशी आमचा संबंध नाही. दोघांचे वडील मात्र मान्यवर पक्षांच्या जबाबदार पदांवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक फाउंडेशनमार्फत की, पक्षामार्फत यावर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.