डॉ. विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा कर्जमाफी घोटाळा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने लाभार्थी शेतकऱ्यांची खोटी यादी सादर करून डिसेंबर २००९ मध्ये ८.८६ कोटी रुपयांची कर्जमाफी पदरात पाडून घेतली. लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन सहकार मंत्र्यांनी १८ ऑगस्ट रोजी दिले होते. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मात्र तरीही कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या घोटाळेबाजांवर भाजपा शासन कारवाई का करत नाही, सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे, असा प्रश्­न उपस्थित करत सहकार मंत्र्यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली.

तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली असून घोटाळेबाजांवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करताना काही त्रुटी/आक्षेप राहिले असल्यास आणि अशा रकमा वसूल झाल्या असतील, तर कारवाई करण्याची आवश्यकता नाही; मात्र जाणीवपूर्वक चुकीचे क्लेम दाखल करून शासकीय रकमा हडप केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले होते.


पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ताळेबंदात कारखान्याच्या माध्यमातून बँकांकडून घेतलेली रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून उपलब्ध केल्याच्या नोंदीच अस्तित्वात नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर जुलै २०१४ मध्ये या कारखान्याकडून मुद्दलाची रक्कम वसूल करणे बँकांना भाग पडले. 

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अरुण पुंजाजी कडू आणि अन्य सदस्यांनी फौजदारी कारवाईस आरंभ केल्यानंतर सहकार खात्याने असहकाराची भूमिका घेतली. याविषयी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती धक्कादायक आहे. 

दिनांक २३ नोव्हेंबर २०१५ या दिवशी तत्कालीन सहकार मंत्र्यांनी 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात फौजदारी किंवा अन्य कारवाई करण्याची आवश्यकता नाही,' असे आदेश दिले आहेत.


एवढेच नव्हे, तर काही अन्य सहकारी कारखान्यांच्या संदर्भात परतफेडीच्या रकमेवरील दंडात्मक व्याज माफ करण्याविषयी झालेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याला संपूर्ण व्याजमाफी देण्यात आली आहे, असे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सचिव संजीव पुनाळेकर यांनी पत्रकारांना दिली. 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात अथवा संबंधित बँकांच्या विरोधात कारवाई केल्यास समन्यायी तत्त्वाने १९२ बँकांवर कारवाई करावी लागेल, असे हास्यास्पद कारण देऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.