मोबाईल चोरी करणार्‍या सराईत आरोपींना अटक,दीड लाखांचा ऐवज जप्त

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोबाईल चोरी करणार्‍या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील नारायणडोह येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 13 मोबाईलसह दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भिंगार येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या बाळू एकनाथ चाबुस्वार (रा. नारायणडोह, ता. जि.नगर) यांचा 2 मार्च रोजी हे शुक्रवारबाजार येथून 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेला होता. याबाबत चाबुकस्वार यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांना या गुन्ह्यातील आरोपी नारायणडोह येथे येणार असल्याचे समजले. त्यानूसार पथकाने सदर ठिकाणाहून दोघा जणांना ताब्यात घेतले. उस्वाल इंपिरीअल चव्हाण (वय 20) व बाबासाहेब संभाजी काळे (वय 32, रा.नारायणडोह) असे त्या दोघांची नावे आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
भिंगार येथील गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. या आरोपींकडे सॅमसंग, ओपो, रेडमी, मोटो, हॉनर इंटेल असे ब्रॅण्डेड कंपनीचे महागडे एकूण 13 मोबाईल मिळून आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल मन्सुर सय्यद, सोन्याबापू नाणेकर, पोलिस नाईक रविंद्र कर्डिले, संदीप पवार आदींनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.