घरातील गॅसमुळे गुदमरून एकाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बुऱ्हाणनगर येथील संकल्प कॉलनी येथे सोमवारी (दि.१९) दुपारी बंद घरामध्ये एलपीजी गॅसने गुदमरुन ४० ते ४२ वयोवर्ष गटाच्या इमसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुऱ्हाणनगर येथील संकल्प कॉलनीत विकास विरसेन अमोलिक हे आपल्या आईसह राहत होते. सोमवारी त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्यामुळे खोलीमालक सुनील केरुळकर यांनी दरवाजा वाजविला, परंतु घरातून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत त्यांनी कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पोलिस पथक आले असता त्यांना घरातून वास आला व घरातील एलपीजी गॅस टाकी शेगडीपासून वेगळी असल्याचे दिसून आले. अमोलिक यांचा गॅसमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.