श्रीगोंदा व नगर तालुक्यातील रस्त्यांसाठी २२ कोटी : आ.जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा - नगर तालुक्यातील ७ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २२.५० कोटी रुपयांचा निधी सन २०१८-२०१९ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. अशी माहिती श्रीगोंदा नगर मतदार संघाचे आमदार राहुल जगताप यांनी दिली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दि.९ मार्च रोजी राज्याचा सन २०१८ - २०१९ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा - नगर तालुक्यातील रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ५ रस्त्यांचा तर नगर तालुक्यातील २ अशा एकूण ७ रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून, कामांसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. हे सर्वच रस्ते तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे रस्ते आहेत.यामुळे येथील शेतकरी, नागरीक या रस्त्यांच्या कामाच्या सुधारणेसाठी वारंवार मागणी केली होती. याची दखल घेत आमदार राहुल जगताप यांनी सदर रस्त्यांचा समावेश अर्थसंकल्पीय निधीत करण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचा समावेश करण्यात आला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राहाता, लोहारे, मांडवे, पारनेर, श्रीगोंदा, कुळधरण, कर्जत, करमाळा रस्ता, जिह्यातील रामा ६० ते काष्टी लिंपणगाव, श्रीगोंदा, देऊळगाव, खांडगाव, मांडवगण यामध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. हिंगणी दुमाला, राजापूर माठ, म्हसे, चिंभळे, रस्ता सुधारणा करणे. काष्टी, खरातवाडी, पेडगाव रस्त्याची सुधारणा करणे. केडगाव, सोनेवाडी, अकोळनेर, घोसपुरी, चिखली, कोरेगाव, गुंडेगाव, वडघुल रस्ता सुधारणा करणे. वाकोडी, बाबुर्डी, घुमट, वाळकी, वडगाव, तांदळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. वाकोडी, बाबुर्डी घुमट, वाळकी, वडगाव तांदळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.