नगर-मनमाड महामार्गावर दुचाकीस्वाराच्या धडकेत वृध्द जखमी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर - मनमाड महामार्गावरील ओबेरॉय हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराच्या धडकेत शहाराम मुरलीधर दाणी हे वृध्द जखमी झाली आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहाराम मुरलीधर दाणी (रा.वांजोळी, ता. नेवासे) हे आपल्या सुनेसह नगर-मनमाड महामार्गावरील ओबेरॉय हॉटेलसमोर रस्ता ओलांडत होते. यावेळी एका दुचाकीस्वाराने (एम.एच.१६ ए.क्यू ९८६४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दाणी यांना जोराची धडक दिली. या धडकेत शहाराम दाणी हे दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
संबंधित दुचाकीस्वार ही घटना घडल्यानंतर जखमी झालेले यांना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून निघून गेला. दरम्यान दाणी यांना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहाराम दाणी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ ए.पी.भोसले हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.