मतभेद विसरून एकत्र येऊया.सुजित झावरे यांनी भाकपच्या अॅड.आझाद ठुबे यांना घातली साद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपले पक्षीय व वैचारिक मतभेद जरूर असतील. परंतु भविष्यात आपण एकत्र आले पाहिजे, अशी साद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. आझाद ठुबे यांना घातली आहे. झावरे यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार विजय औटी यांच्याबरोबर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत साथ देणारे त्यांचे भाचे भाकपचे अॅड. ठुबे यांच्याशी राजकीय मैत्रीचा हात पुढे केल्याने पारनेर तालुक्यातील समीकरणे बदलण्ची चिन्हे आहेत. दरम्यान, झावरेंच्या या सादेला ठुबे काय प्रतिसाद देतात याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यातील शिवसेनेचा राजकीय धुराडा खाली बसतो न बसतो, तोच यापुढील काळात अॅड. ठुबे व कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी एकत्र काम करावे, अशी गळ टाकळी ढोकेश्वर येथील एका कार्यक्रमात सुजित झावरे यांनी घातली. यानंतर अॅड. ठुबे व झावरे या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात एकत्र काम करावे, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे आगामी विधानसभा व कान्हूर पठार ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अॅड. ठुबे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

नीलेश लंके यांची सुजित झावरेंशी वाढलेली जवळिकीवरून शिवसेनेमध्ये वादंग निर्माण झाले होते.परिणामी शिवसेनेचे आमदार विजय औटी व लंके यांच्यामध्ये सोपस्करित्या दुरावा निर्माण करण्यात झावरेंची खेळी यशस्वी ठरली होती. आता आमदार औटी यांच्याबरोबर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत साथ देणारे त्यांचे भाचे आझाद ठुबे यांना गळ घातली आहे. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून झावरे व भाकपकडून अॅड. ठुबे हे दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे झावरेंची ठुबेंना दिलेली साद मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

कान्हूर पठार ग्रामपंचायत बिनविरोध? 
अॅड. ठुबे यांच्या गावची कान्हूर पठार ग्रामपंचायतची निवडणूक सप्टेंबरमध्ये होत आहे. भविष्यात कार्यकारी संचालक दिलीप ठुबे व आझाद ठुबे यांनी एकत्र काम करावे, अशी गळ झावरे यांनी घातली. यावर ठुबे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. कान्हूर पठार ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधक आहे. ही ग्रामपंचायत बिनविरोध होते की काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

भाच्याच्या नथीतून आमदार औटींवर तीर. 
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लंकेंशी जवळीक साधत औटी-लंके यांच्यात राजकीय दुरावा निर्माण करण्यात झावरे यशस्वी झाले, तर आता आमदार औटी यांचे भाचे अॅड. ठुबे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न झावरे यांनी केला आहे.अॅड. आझाद ठुबे या भाच्याच्या नथीतून शिवसेनेचे आमदार औटी याच्यावर तीर मारण्यासाठी ही खेळी झावरे यांची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.