भाजप नेत्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन - डॉ. सुजय विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने निवडणुकीच्या वेळी दिलेले एक तरी आश्वासन पूर्ण केले आहे का, ज्या धनगर समाजाला आरक्षण देण्याचे स्वप्न दाखवत सत्ता मिळवली, त्या समाजाच्या नेत्यांना केवळ मंत्रिपद देऊन खूश केले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले नसताना जिल्हा विभाजनाचा घाट घातला जात आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्ह्यातील सर्व गावांना तलाठी, ग्रामसेवक आणि नागरपंचायतींना मुख्याधिकारी देण्याची कुवत प्रशासनात नसताना पाचशे कोटी खर्चाचे जिल्हा विभाजन कशासाठी? केवळ स्थानिक नेत्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन रेटले जात असल्याची टीका युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा विभाजनाला विरोध नाही !
जनसेवा फाउंडेशनच्या वतीने कोळगाव येथे आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. जिल्हा विभाजन नेमके कशासाठी करायचे याचा खुलासा अगोदर केला पाहिजे. गरज असेल, तर जिल्हा विभाजन करावे. आपला विभाजनाला विरोध नाही. तथापिस जिल्ह्यात अजून सर्व गावांना ग्रामसेवक, तलाठी आणि नव्याने तयार झालेल्या नगरपंचायतींना अजून मुख्याधिकारीसुद्धा पूर्ण वेळ मिळालेले नाहीत. ग्रामीण भागाचे प्रश्न आणि गरजा पूर्ण झाल्या नसताना आणि शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीसुद्धा झाली नसताना पाचशे कोटी रुपये खर्च करून जिल्हा विभाजन कशासाठी, असा सवाल डॉ. विखे यांनी केला. 

नव्या घोषणा करण्याचे काम सरकार करत आहे.
जिल्हा विभाजनापेक्षा महसूल विभाजन करा. अनेक नागरिकांना नाशिक हे विभागीय कार्यालय असल्याने जास्त अंतर जावे लागते. त्याऐवजी पुणे विभागीय कार्यालय करा. केवळ नव्या घोषणा करण्याचे काम सरकार करत आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांना सामान निधीचे वाटपसुद्धा करण्यात आलेले नाही. ज्या तालुक्याचा पालकमंत्री होतो, त्याच तालुक्याला सर्वाधिक निधी आणि योजना जातात, असेही डॉ. विखे म्हणाले. 

केवळ विखेंनीच केलेली कामे मी सांगतो... 
जिल्ह्यात विखे कुटुंबीयांनी मोठी विकासकामे केली आहेत. राधाकृष्ण विखे कृषिमंत्री असताना त्यांनी अनेक शेतकरीहिताच्या योजना राबवल्या. यापूर्वीच्या सरकारात जिल्ह्यात आदिवासी आणि वनमंत्री पद होते, तसेच महसूल मंत्रिपदही होते. पण त्यांनी आणि आजच्या सरकारमधील मंत्र्यांनी काय केले, यापेक्षा आमच्या विखे कुटुंबीयांनी काय कामे जिल्ह्यात केली हेच सर्वांना सांगतो, असे डॉ. विखे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.