पती-पत्नीत वादात मध्यस्थी करणाऱ्या सासूचे बोट कुऱ्हाडीने कापले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्नीला सासरी नांदायला येण्याच्या कारणावरून पती-पत्नीत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सासूच्या डाव्या हातावर जावयाने हातातील कुऱ्हाडीने वार केला. यात सासूच्या मधल्या बोटाची कांडीच तुटली. कारेगाव शिवारातील बरड वस्तीवर २५ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : बाबासाहेब भास्कर थोरात (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) याची पत्नी वैशाली कारेगाव येथे माहेरी होती. तिला आणण्यासाठी तो २५ फेब्रुवारी रोजी सासुरवाडीला गेला. यावेळी नांदण्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. बाबासाहेब हा वैशालीला मारहाण करत असताना तिची आई जिजाबाई तुकाराम औटी (वय ५०) या वाद सोडविण्यासाठी मध्ये पडल्या.

यावेळी बाबासाहेब याच्या हातात कुऱ्हाड होती. त्याने कुऱ्हाडीचा घाव जिजाबाई यांच्या डाव्या हातावर घातल्याने त्यात त्यांच्या हाताचे मधल्या बोटाची कांडी तुटली. घटनेनंतर जिजाबाई यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या जवाबावरून तालुका पोलिसांनी गु.र.नं. २१/१८, भादंवि कलम ४५२, ३२६, ३२३, ५०२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बाबासाहेब यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार ससाणे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.