राहुरी पालिकेला एक कोटींचा विशेष रस्ता निधी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य शासनाने राहुरी नगरपालिकेला विशेष रस्ता निधी म्हणून एक कोटी रुपयांचा निधी थेट राहुरी नगरपालिकेला दिला. तसेच शहराचे वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.८६ दशलक्ष घनमीटर वाढीव पाणी आरक्षणास गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मंजुरी दिली आहे. त्या दोन्हीचे मंजुरीचे पत्र राहुरी नगरपालिकेस प्राप्त झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी नगरपालिकेने राज्य सरकारकडे शहराचे विकास कामांना विशेष निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकवेळा मागणी केली होती. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्या प्रयत्नास यश येऊन शासनाने दि. २२ फेब्रुवारी २०१८ चे शासन निर्णयान्वये रस्ताअ /२०१८ /प्र क्र २७ /नवि १६ प्रमाणे नगरविकास विभागाने राहुरी नगरपालिकेस विशेष रस्ता अनुदान म्हणून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र नगरपालिकेस प्राप्त झाले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यांचे तसेच याकामी मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत वेळीवेळी मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचेही नगरपालिकेच्या वतीने तसेच शहरातील नागरिकांचे वतीने आभार मानण्यात आले आहे. 

शासनाने मंजूर केलेल्या या निधीतून शहरातील वाडी वस्तीवरील रस्त्याची कामे करता येतील त्याचबरोबर नगरपालिकेस शासनाकडून रस्ते विकासासाठी सर्वसाधारण निधी ३५ लाख रुपये मिळत असून त्यातून शहरातील रस्त्यांची कामे केली जातील, असे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. या कामासाठी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक या निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत होते.

राहुरी शहराची २९ कोटी रुपयांची वाढीव पाणीयोजना शासनाकडे प्रस्तावित असून नवीन सादर केलेली पाणी योजनेस २०३१ सालाची लोकसंख्या विचारात घेऊन योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पूर्वीच्या नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणी योजनेस पाटबंधारे विभागाने २.२३ दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून आरक्षणास मंजुरी दिली होती. 

आता नव्याने सादर केलेल्या वाढीव पाणी योजनेस लागणाऱ्या जादा पाण्यास गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची मंजुरी आवश्यक होती व त्या अभावी योजेनेस मंजूरी मिळत नव्हती. याबाबत नगरपालिकेने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर महामंडळाने राहुरी नगरपालिकेला ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मंजुरी दिल्याचे पत्र दिल्याने शहराचे नव्याने सादर केलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजना करण्यास येणारा अडथळा दूर झाल्याचे श्री. तनपुरे यांनी सांगितले.

रस्ते व पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, तसेच गटनेते जयंत पाटील यांचे आभार मानले आहे. नगरपालिकेच्या जोगेश्वरी आखाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याचे टाकीचे काम पूर्ण होऊन या प्रभागतील अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगती पथावर असून लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर जोगेश्वरी आखाडा, वराळे वस्ती, काळे आखाडा येथील तसेच येवले आखाडा येथील नागरिकांना थेट मुळा धरणातील पाणी पिण्यास मिळणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.