अखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी विक्रम राठोड यांची निवड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या हरिव्दार (उत्तराखंड) येथे झालेल्या अधिवेशनात नगरचे नगरसेवक विक्रम राठोड यांची महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी निवड झाली आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष रतनसिंह राठौर, महामंत्री देवीलाल राठौर, कोषाध्यक्ष चुलेश्‍वर राठौर आदींनी या निवडीचे पत्र विक्रम राठोड यांना देवून त्यांचा गौरव केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमल राठौर, महेश राठौर, दिनेशचंद्र राठौर, सुरेश राठौर, राजेश सोलंकी यांच्यासह नगरमधील सूरजबन्स राठोड समाज ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.नगरमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुखपद भूषविणारे नगरसेवक विक्रम राठोड यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना समाजाने एकमुखाने राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पदाच्या माध्यमातून ते समाजाचे व्यापक संघटन करून युवा वर्गासाठी विधायक उपक्रम राबवतील, असा विश्‍वास महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विक्रम राठोड यांचे सूरजबन्स राठोड समाज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मंत्री अनिलभैय्या राठोड, उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, कांचन राठोड, सेक्रेटरी दुर्गाप्रसाद राठोड, खजिनदार शाम राठोड, सह सेक्रेटरी महेंद्र राठोड, गणेश राठोड, सदस्य ओमप्रकाश राठोड, रूबी राठोड, महेश राठोड, योगेश परदेशी,पंकज राठोड, शितल राठोड, सुचिता परदेशी, भावना राठोड, लता राठोड आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.